स्वातंत्र्य जाहीर करा, खलिस्तान समर्थक एसएफजेचे ठाकरे, ममतांना आवाहन

Uddhav Thackeray - Mamata Banerjee - SFJ

दिल्ली : महाराष्ट्र (Maharashtra) आणि पश्चिम बंगालने (West Bengal) भारतापासून वेगळे व्हावे, स्वातंत्र्य जाहीर करावे, असे आवाहन ‘शीख फॉर जस्टिस’ (एसएफजे) (Sikhs for Justice) संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना पत्र पाठवून केले होते. या दोन्ही राज्यांनी भारतीय संघ राज्य व्यवस्थेतून बाहेर पडून स्वातंत्र्य जाहीर करावे आणि भारताशी संबंध तोडून टाकावे अशी मागणी ‘शीख फॉर जस्टिस’ने केली होती.

एसएफजेने आता एक वेबसाइट लाँच केली आहे. उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांनी आमच्या मागणीची दखल घ्यावी यासाठी लोकांनी या दोन्ही मुख्यमंत्र्यांना ई-मेल पाठवावे, असे आवाहन एसएफजेने केले आहे. ‘शीख फॉर जस्टिस’ ही स्वतंत्र खलिस्तानचे समर्थन करणारी देशविरोधी संघटना आहे. भारत सरकारने तिच्यावर बंदी घातली आहे.

सध्या दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन आणि प्रजासत्ताकदिनी दिल्लीत झालेला हिंसाचार, या मध्ये एसएफजेचा सहभाग असल्याचा आरोप होतो आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांचे केंद्र सरकारशी सख्य नाही. अनेक मुद्यांवर मतभेद आहेत. त्यामुळे फुटीरतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी एसएफजेने महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालची निवड केली, असे केंद्रीय गुप्तचर यंत्रणेतील सूत्राने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER