अतिवृष्टी नैसर्गिक आपत्ती घोषित करा – अतुल भातखळकर

पीडितांना प्रत्येकी १० हजार मदतीची मागणी

Atul Bhatkhalkar & Cm Uddhav Thackerauy

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागांत  घरांमध्ये पाणी शिरल्याने वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अतिवृष्टीला नैसर्गिक आपत्ती जाहीर करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मुंबईकरांना प्रत्येकी १० हजार रुपये मदत करा, अशी मागणी भाजपाचे (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून केली आहे.

या अतिवृष्टीबद्दल मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल म्हणाले की – या वादळी पावसात अवघ्या १२ तासांत  मुंबईत २९४ मि. मी. पाऊस झाला. भातखळकर म्हणाले की, याचाच अर्थ ही नैसर्गिक आपत्ती आहे. दरवर्षी मुंबईत पाणी तुंबते. मात्र या वर्षी परिस्थिती जरा वेगळी असून, ही नैसर्गिक आपत्ती आहे.  त्यामुळे या दोन दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीला नैसर्गिक आपत्ती जाहीर करून मुंबईकरांना मदत करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER