ब्लॅक फंगसला महामारी म्हणून घोषित करा; सोनिया गांधींचे मोदींना पत्र

Sonia Gandhi - PM Narendra Modi

नवी दिल्ली :- देशात कोरोनासोबत (Corona)आता ब्लॅक फंगसचा (Black Fungus) धोका वाढला आहे. अशा वेळी बाजारात ब्लॅक फंगसच्या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. त्यावर आता काँग्रेस (Congress) नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी चिंता व्यक्त केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) एक पत्र लिहिलं आहे. ब्लॅक फंगसला महामारी घोषित कारण्यासह उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्या, अशी मागणी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे.

सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, केंद्र सरकारने ब्लॅक फंगस महामारी घोषित करावी. या आजाराने ग्रस्त असलेल्या सर्व रुग्णांवर मोफत उपचार करण्यात यावेत. तसेच या आजाराचा आयुष्यमान भारतसह इतर आरोग्य विमा योजनांमध्ये समावेश करण्यात यावा. एम्फोटेरिसिन-बी हे औषध ब्लॅक फंगसवर उपयुक्त ठरत आहे. परंतु, सध्या बाजारात या औषधाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे हे औषध उपलब्ध करून देण्यासाठी तत्काळ पावलं उचलण्यात यावीत.

कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यापासून सोनिया गांधी वारंवार मोदींना पत्रं लिहून अनेक सूचना करत आहेत. सोनिया गांधींनी या आधी गुरुवारी पंतप्रधानांना एक पत्र लिहिलं होतं. ज्या मुलांनी कोरोनामुळे आपले आई-वडील वा यापैकी कोणी एक गमावलं असेल त्यांच्या मोफत शिक्षणाची सोय केंद्र सरकारने जवाहर नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून करावी अशी विनंती त्यांनी पंतप्रधानाना केली होती. त्या आधीही सोनिया गांधींनी पंतप्रधानांना वेळोवेळी पत्रं लिहून सूचना केल्या आहेत.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button