लक्षद्वीप प्रशासकाच्या निर्णयांमुळे बेटाची अनोखी संस्कृती नष्ट होईल, पवारांचे मोदींना पत्र

Sharad Pawar-PM Modi

नवी दिल्ली : लक्षद्वीप (Lakshadweep) येथे केंद्राकडून नेमण्यात आलेले नवीन प्रशासक प्रफुल पटेल(Praful Patel) यांच्या निर्णयांमुळे स्थानिक जनतेने संताप व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी केंद्र सरकारने नेमलेले प्रशासक प्रफुल खोडा पटेल यांच्यावर टीका केली. तसेच लक्षद्वीपमध्ये प्रशासक पटेल यांनी घेतेलले निर्णय तर्कहीन असल्याचं मत व्यक्त करत लक्ष घालण्याची मागणी केली.

प्रफुल खोडा पटेल यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे लक्षद्वीपमधील लोकांकडून त्यांचे उपजीविकेचे पारंपारिक साधन आणि या बेटाची अनोखी संस्कृती नष्ट होईल, असा इशारा देत त्यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांना थेट पत्रच लिहिलं. यात त्यांनी मोदींना लक्षद्वीप प्रकरणात लक्ष घालण्यास सांगत प्रशासक प्रफुल पटेल यांचे निर्णय तर्कहीन असल्याचं म्हटलं. तसेच स्थानिक लोकांचे मत विचारात घेऊन काम करणाऱ्या प्रशासकाची तेथे नियुक्ती केली जावी, अशी मागणीही पवार यांनी केली.

स्थानिक मच्छिमारांची किनारपट्टीवरील साहित्यसामुग्री कसलीही नोटीस न बजावता उद्ध्वस्त करणे, अंगणवाड्या बंद करून लोकांना बेरोजगार करणे, तेथे दारूबंदी असताना नव्याने त्याबाबतची परवानगी देणे, स्थानिक डेअऱ्या बंद करून त्यांच्या खासगीकरणाची प्रक्रि या सुरू करणे अशा विविध ११ मुद्यांवर पवार यांचे पत्र आधारित आहे. या नियमांमुळे याआधीही अशांतता पसरली होती आणि या निर्णयांना विरोध झालाय. त्यामुळे प्रशासक पटेल यांच्या आदेशांवर आणि नियमांवर पुनर्विचार व्हावा. लक्षद्वीप प्रशासनाने हे तर्कहीन आदेश रद्द करावेत, अशी मागणीही पवारांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे.

I would like to draw Hon’ble PM’s kind attention towards certain serious concerns raised by Shri P. P. Mohammed Faizal, MP (Lok Sabha), Lakshadweep, with regard to the policy decisions taken by the newly appointed Administrator of #Lakshadweep.@PMOIndia @narendramodi pic.twitter.com/fgCKvQMESL

— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 26, 2021

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button