धक्कादायक : राज्यातील लाखो कोंबड्या आज मारणार बर्ड फ्लू रोखण्यासाठी निर्णय

Bird Flu

मुंबई :- राज्यात बर्ड फ्लूने डोके वर काढले असून त्याला अटकाव करण्यासाठी मंगळवारी राज्यातील ज्या-ज्या भागात बर्ड फ्लूचा संसर्ग आढळला त्याच्या एक किलोमीटरच्या परिसरातील कोंबड्या मारण्यात येणार आहेत. राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने हा निर्णय घेतला आहे. एकट्या परभणी जिल्ह्यात ८० हजार कोंबड्या मारण्यात येणार आहेत.

बर्ड फ्लू वा अन्य कोणत्याही संसर्गास रोखण्यासाठी अशी कार्यवाही करण्याचे केंद्रीय कायद्यानुसार राज्यांना अधिकार देण्यात आले आहेत. त्याचा वापर करून पशु संवर्धन विभागामार्फत कोंबड्या मारण्याची कारवाई केली जाणार आहे. बर्ड फ्लूने हातपाय पसरले. आतापर्यंत १२०५ पक्षी आणि एक हजार कोंबड्यांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाला असल्याचे तपासणीत पुढे आले आहे. आणखी काही नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. राज्यात बर्ड फ्लूचा संसर्ग वाढत असल्यान अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज दिवसभरात मुंबई, ठाणे, परभणी, दापोली, बीड, अकोला, लातूर, गोंदिया, चंद्रपूर, या भागांतील पक्षांचे नमुने बर्ड फ्लू संसगार्चे पॉझिटिव्ह आढळले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळी पशुसंवर्धन आणि संबंधित अन्य विभागाचे मंत्री व वरिष्ठ अधिकाºयांची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर घेतली. बर्ड फ्लूचा संसर्ग होण्यामध्ये परभणी आघाडीवर असून आतापर्यंत ८४३ कोंबड्यांना बाधा झाली आहे. त्यापाठोपाठ लातूरमध्ये २४० कोंबड्यांना बर्ड फ्लू झाला आहे. बीडमध्ये ११,  ठाणे २०,  दापोली (रत्नागिरी) ९,  अकोला १,  गोंदिया व चंद्रपूर प्रत्येकी २, नागपूर ४५,  अमरावती ३० तर नाशिकमध्ये २ कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. अत्यंत अलर्ट राहून यंत्रणेने बर्ड फ्लूला अटकाव करावा असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी या बैठकीत दिले. तसेच ही बैठक संपताच त्यांनी राज्यातील काही जिल्हाधिकाऱ्यांची व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यात बर्ड फ्लू शोधण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे ठिकठिकाणी कोंबड्या तसेच गरज पडल्यास माणसांचीही आरोग्य चाचणी घेण्यात येणार आहे. गावागावांत सर्वे करण्यात येत असून २ बाय २ चे खड्डे खोदून त्यामध्ये सुमारे १८०० पक्षी पुरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. २००६ मध्ये राज्यात बर्ड फ्लूची लागण झाली होती. त्यावेळी १९ लाख कोंबड्या मारण्यात आल्या होत्या. त्यावेळी देशात या रोगामुळे एकाही माणसाचा मृत्यू झाला नव्हता.

बर्ड फ्लूसंदर्भात अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे (CM Thackeray) यांनी केले आहे. बर्ड फ्लूची लागण ज्या भागातील पक्षांना झाल्याचे आढळले आहे त्या भागातील माणसांनीदेखील अन्य भागात जाण्याचे टाळावे असे आवाहन मंत्री सुनील केदार यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER