राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

सहकारी संस्था निवडणूक

मुंबई :- राज्यात कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे अनेक निर्बंध घालण्यात आले आहे. आता आणखी एक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्यात आल्या आहे.

राज्यात कोरोनाची परिस्थिती बिकट होत असल्यामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता 31 ऑगस्टपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहकारी साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती बँका, नागरी बँका यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा सहकार विभागाने जाहीर केला आहे. यापूर्वी 31 मार्चपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला, असं सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केलं.

कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे राज्यात ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्यात. त्यानंतर राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँका, पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. पण, राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 6 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button