उर्मिला मातोंडकरांबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील – संजय राऊत

Urmila Matondkar - CM Uddhav Thackeray - Sanjay Raut

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांना शिवसेना (Shiv Sena) आपल्या कोट्यातून विधानपरिषदेची उमेदवारी देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले.

मातोंडकरांचा विषय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray) अखत्यारित आहे, कॅबिनेटचा निर्णय आहे, सीएम निर्णय घेतील, असे राऊत म्हणाले .

खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरून उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उर्मिलाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतली, असं सांगत या विषयावर अधिक बोलणं टाळलं. उर्मिला मातोंडकर यांची विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त जागेवर शिवसेनेकडून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. दरम्यान उर्मिला यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यानंतर शिवसेनेशी त्यांची जवळीक वाढली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER