पुढील आठवड्यात दहावी, बारावी परीक्षांसंदर्भात निर्णय : विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar

नागपूर : दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. त्यानुसार बारावी बोर्डाची परीक्षा २३ एप्रिलपासून तर दहावीची परीक्षा २९ एप्रिलला सुरू होणार आहे. दरम्यान, हे संभाव्य वेळापत्रक बोर्डाने संकेतस्थळावर जाहीर केले होते. पण अंतिम दहावी, बारावीच्या परीक्षांसंदर्भातला निर्णय पुढील आठवड्यात घेतला जाणार आहे, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली आहे.

कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे शाळा सुरू ठेवाव्यात की नाही, दहावी-बारावीची परीक्षा ऑनलाईन घ्यावी की ऑफलाईन घ्यावी, यावर वेगवेगळे विचार आहेत. याबाबत विचार करून निर्णय घेण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. त्यात चर्चा करून निर्णय घेतले जातील, असेदेखील वडेट्टीवार यांनी सांगितले.

कोरोनाचा धोका लक्षात घेता सरकार शहरांमध्ये नाईट कर्फ्यूचा विचार करत आहेत. संध्याकाळी ६ नंतर पहाटेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीनुसार जिल्ह्याधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावे, असे निर्देश सरकारने दिल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER