मुस्लिम आरक्षणाचा अद्याप निर्णय नाही : एकनाथ शिंदे

मुंबई :- कॅबिनेट सहकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केल्यानंतर लगेच असला कुठलाही निर्णय झाला नसल्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. सत्तारूढ महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष यावर चर्चा करणार असल्याचे नगर विकासमंत्री शिंदे म्हणाले. यापूर्वी अल्पसंख्यांक मंत्री असलेले मलिक यानी विधान परिषदेत घोषणा करताना म्हटले होते की सरकार शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिमांना प्रस्तावीत 5 टक्के आरक्षण देण्यास अनुकूल आहे.

आता पाहुया, अजित दादा पवार यांच्याविषयीची महत्त्वाची बातमी; सुप्रिया सुळे बनल्या न्यूज अँकर

परंतू शिंदे यांनी विधानभवनाबाहेर पत्रकारांशी बोलतांना सांगितले की मला या घोषणेबाबत काहीही माहिती नाही. कुठल्याही समुदायाला आरक्षण देण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय हा महाविकास आघाडीचे नेते एकत्रितपणे घेत असल्याचे शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत योग्य निर्णय योग्यवेळी घेतील. मात्र अद्यापतरी हा निर्णय झाला नसल्याचे शिंदे म्हणाले.