10 वी आणि 12 च्या परीक्षेबाबत लवकरच निर्णय : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

Education Minister Varsha Gaikwad

कोल्हापूर : दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरु होतात. मात्र, यंदा कोरोना महामारीमुळे या परीक्षा कधी होणार? अभ्यासक्रम किती असणार? असे असंख्य प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहेत. या पार्श्वभूमीवर 10 वी आणि 12 च्या परीक्षेबाबत लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज कोल्हापुरात दिली आहे.

गायकवाड म्हणल्या, 9 ते 12 वी वर्ग सुरू करताना जी काळजी घेतली तिच काळजी यावेळी देखील घेतली जाणार असून 10 दिवसात सगळी तयारी करण्यात येणार आहे. 15 ते 16 लाख विद्यार्थी सध्या वर्गात आहेत. मात्र, कोरोना लागण होऊ नये याची खबरदारी घेतली आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य हीच आमची प्राथमिकता आहे. 2025 पर्यंत शाळांची गुणवत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व शासकीय शाळेत इंटरनेट पोहचवलं जाईल. माझं शिक्षण माझं भविष्य, ही शिक्षण क्षेत्रातील नवीन टॅगलाईन असेल.

दरम्यान, राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल (15 जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली. शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांना केली. राज्यात जरी शाळा सुरु होणार असल्या तरी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणमध्ये जरी आला असला तरी अन्य देशांमधील कोरोनाची दुसरी लाट व अन्य राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता मुंबईतील शाळा या 16 जानेवारीपासून पुढील आयुक्तांचे आदेश मिळेपर्यत बंद राहतील, असं मुंबई महापालिका शिक्षण विभागाकडून परिपत्रक काढून सांगण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER