लॉकडाऊनचा निर्णय : खासदार इम्तियाज जलील यांचा आंदोलनाचा इशारा

imtiyaz-jaleel

औरंगाबाद : दिवसेंदिवस कोरोना (Corona) रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३० एप्रिलपासून औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. मात्र, या निर्णयाला AIMIM चे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी विरोध दर्शवला आहे. जिल्ह्यात लॉकडाऊन लावणे म्हणजे उद्योजकांना खूश करण्याचा प्रयत्न असल्याची टीका जलील यांनी केली आहे. या निर्णयाविरोधात इम्तियाज जलील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. ३१ मार्च रोजी लॉकडाऊन निर्णयाविरोधात आंदोलन करण्याची घोषणा जलील यांनी केली आहे. या आंदोलनावेळी वैद्यकीय विभागात तातडीने भरती करण्यात यावी, अशी मागणीही केली जाणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ३० मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

उद्योग क्षेत्र वगळले

औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शनिवारी लॉकडाऊनबाबतचे आदेश काढले. दरम्यान किराणा दुकाने सकाळी ८ ते १२ पर्यंत, तर दूध आणि भाजीपाल्याची विक्री सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहे. महत्त्वाचे म्हणजे लॉकडाऊनमधून उद्योग क्षेत्राला वगळण्यात आले आहे. रुग्ण वाढत असल्याने जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी संचारबंदीचे आदेश दिले आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

  1. सर्व उद्योग आणि पुरवठादार नियमानुसार काम करतील.
  2. औद्योगिक वस्तूंचा पुरवठा सुरळीत चालू ठेवण्यासाठी स्थानिक, आंतरजिल्हा, आंतरराज्य वाहतूक शासकीय नियमानुसार सुरू राहणार आहे.
  3. त्याचबरोबर वृत्तपत्रे, नियतकालिकांची छपाई आणि वितरण सुरू राहील. डिजिटल आणि प्रिंट मीडिया यांची कार्यालयेही शासकीय नियमानुसार सुरू राहणार आहेत.
  4. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडावा, असे आदेशही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button