वेळ-काळ ठरवा, आम्ही नितेश राणेंना राजीनामा द्यायला लावतो ; भाजपने शिवसेनेचे आव्हान स्वीकारले

rajan Teli & Vaibhav Naik

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप शिवसेना (Shivsena) रणकंदन पाहायला मिळत आहे. तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या कंगना रनौतहिने भूमिकेसाठी आपल्या वजन वाढवताना काय त्रास झाला हे सांगितलं आहे. शिवसेना-भाजपमध्ये आव्हान प्रतिआव्हानाच्या फैरी झडू लागल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने आव्हान स्वीकारत शिवसेनेलाच निवडणुकीची वेळ ठरवण्यास सांगितलं आहे. भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार राजन तेली (Rajan Teli) यांनी शिवसेना आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांचं चॅलेंज स्वीकारलं आहे.

वेळ आणि काळ सांगा, आम्ही भाजप आमदार नितेश राणेंना राजीनामा द्यायला लावतो. असं थेट आव्हान आता भाजपने शिवसेनेला दिले आहे. राणेंसोबतच शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, दीपक केसरकर आणि खासदार विनायक राऊत यांनीही त्याचवेळी राजीनामा द्यावा. 2024 च्या निवडणुकीची वाट न पाहता त्यांनी वेळ सांगावी. चारही निवडणुका पुन्हा होऊ देत, बघू सिंधुदुर्गची जनता कोणाला हद्दपार करते ते, असं चॅलेंज भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार राजन तेली यांनी दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER