कर्जमाफीची यादी 28 फेब्रुवारीला जाहीर होणार

debt waiver list will be announced on February 28

कोल्हापूर : राज्य सरकारच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्याची तारीख आठ दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. ही यादी शुक्रवारी (ता.२१) जाहीर होणार होती, पण ती आता २८ फेब्रुवारीला होणार आहे.

या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील ५७ हजार शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यास केल्या असून शेतकऱ्यांना ३८७ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंत थकीत पीककर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राष्ट्रीय आणि सहकारी बँकांकडील कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या सहकार खात्याने तयार केल्या आहेत. जिल्हा बँकेअंतर्गत १६२६ विकास सेवा संस्थांतील ३२ हजार ६३३ शेतकऱ्यांचे १६३ कोटी ३० लाख रुपये कर्ज थकीत आहे. तर राष्ट्रीय बँकांच्या २४ हजार शेतकऱ्यांचे २२४ कोटी रुपये कर्ज थकले आहेत. या थकीत कर्जदार शेतकऱ्यांची यादी सहकार खात्याने बँकांना दिली आहे.