राज्यात मृत्यू संख्येत वाढ! दिवसभरात ३४९ जणांचा मृत्यू, तर ६१ हजार ६९५ करोनाबाधित वाढले

Maharashtra Coronavirus

मुंबई :- राज्यातील कोरोनाची (Corona) स्थिती दिवसेंदिवस चिंता वाढवणारी झाली आहे. आज कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येसह मृत्यूची संख्याही कमालीची वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील करोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्यशासनाकडून १५ दिवसांचा लॉकडाउन देखील जाहीर करण्यात आलेला आहे. मात्र तरी देखील करोनाबाधित मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. आज दिवसभरात राज्यात ६१ हजार ६९५ नवीन करोनाबाधित वाढले असून, ३४९ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.६३ टक्के एवढा आहे.

दरम्यान, आज ५३ हजार ३३५ रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २९,५९,०५६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८१.३ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३०,३६,६५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३६,३९,८५५ (१५.८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,८७,४७८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २७,२७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button