रशियात शिकणाऱ्या पुण्यातल्या तरुणाचा मृत्यू ; सुप्रिया सुळे मदतीला धावल्या, नातेवाइकांना घडले शेवटचे दर्शन

Supriya Sule - Maharashtra Today
Supriya Sule - Maharashtra Today

पुणे :- जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पुणे जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याचा रशियात कर्करोगामुळे मृत्यू (Indian student death in Russia) झाला होता. पण भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्याचे पार्थिव मायदेशी आणण्यात अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे आपल्या मुलाचं शेवटचं दर्शनही नशिबात आहे की नाही ही  चिंता नातेवाइकांना सतावत होती. पण बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नानंतर कुटुंबीयांना आपल्या मुलाचं शेवटचं दर्शन मिळू शकलं.

माहितीनुसार , २२ वर्षीय मृत विद्यार्थ्याचं नाव तन्मय आबासाहेब बोडके असून तो इंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथील रहिवासी होता. तो रशियात एमबीबीएसचं शिक्षण घेत होता. रशियातील निझनी नोवागोर्ड विद्यापीठात तो एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होता. पण मागील काही दिवसांत त्याचं अचानक वजन वाढायला सुरुवात झाली.  त्याचं वजन इतकं  वाढलं की, त्याला चालणंही मुश्कील  झालं. रुग्णालयात तपासणी केली असताना त्याला कर्करोग झाल्याचं निष्पन्न झालं. कर्करोगावर शस्त्रक्रिया सुरू असताना अचानक रक्तदाब कमी झाल्यानं त्याचा परदेशात मृत्यू झाला.

वृत्तानुसार, २९ एप्रिल रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तन्मयचा मृतदेह आणला.  तेथून रुग्णवाहिकेनं मूळगावी आणण्यात आला. ३० एप्रिल रोजी तन्मयवर  पिंपरी बुद्रुक या ठिकाणी अत्यंसंस्कार करण्यात आले. कोरोना काळात परदेशात मुलाचा मृत्यू झाल्यानंतर मुलाचे शेवटचे दर्शन होईल की नाही  याची  काहीही शक्यता नसताना, सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून नातेवाइकांना शेवटचे दर्शन घडले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button