आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या त्या सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू

Kolhapur

कोल्हापूर :- इचलकरंजी पालिकेत आत्मदहन केलेल्या सामाजिक कार्यकर्त्याचा उपचारादरम्यान सांगली येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. नरेश सीताराम भोरे (वय ४८, रा. सोलगे, शहापूर रोड, इचलकरंजी) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी सोमवारी दुपारी अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले होते. यामध्ये ते भाजून गंभीर जखमी झाला होते. मृत्यूची माहिती समजताच नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली.

त्यांनी संबंधित दोषींवर कारवाई जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यात नकार दिला. त्यामुळे हॉस्पिटल परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांना घंटागाडी चालक अमर लाखे (रा. इचलकरंजी) याने केलेल्या मारहाणी व मेलेले डुक्कर जबरदस्तीने घंटागाडीत उचलून टाकण्यास भाग पाडल्याच्या निषेधार्थ आज दुपारी आत्मदहन केले होते.

ही बातमी पण वाचा : नगरपालिकेत सामाजिक कार्यकर्त्यांने घेतले पेटवून

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER