बेड न मिळाल्याने ॲाक्सिजन सिलेंडरसह आंदोलन केलेल्या रुग्णाचा मृत्यू

Covid Death - Maharastra Today

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसारख्या शहरात रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.  एका बाजूला नियम मोडणारे बेजबाबदार नागरिक आहेत. तर दुसऱ्या बाजूला आरोग्य यंत्रणेतील त्रुटी समोर येत आहे. अनेक रुग्णालय फिरूनही बेड मिळत नसल्याने काल दोन कोरोनाग्रस्त रुग्ण नाशिक महापालिकेसमोरच आंदोलनाला बसले होते.

ऑक्सिजन सिलेंडरसह आंदोलन करणाऱ्या दोन कोरोनाबाधित रुग्णांपैकी एकाचा काल रात्रीच मृत्यू झाला. रुग्णालयात बेड मिळत नसल्याने त्यांनी  महापालिका मुख्यालयात आंदोलन केले. या आंदोलनाने महापालिका परिसरात खळबळ उडाली होती. प्रशासनाने ऑक्सिजन सिलेंडरसह आंदोलन करणाऱ्या व्यक्तीला बिटको रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, बिटको हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री या रुग्णाचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर बेड मिळत नसल्याने संबंधित रुग्णाला महापालिकेत आणणाऱ्या व्यक्तींवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आंदोलन करणाऱ्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत होता. अशा स्थितीत या दोन्ही रुग्णांनी महापालिकेसमोरच ठिय्या मांडला. प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने पहावे आणि लवकरात लवकर चांगल्या उपाययोजना करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button