सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा होणार सुरू

Dearness allowance of government employees will be resumed

नवी दिल्ली : कोरोनामुळे (Corona) कोलमडलेल्या आर्थिक गणितांमुळे बंद झालेला केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महाभाई भत्ता पुन्हा सुरू झाला आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महाभाई भत्त्यात ४ टक्के वाढ केली आहे. याचा फायदा जवळपास १ कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. यात ३८ लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांचा समावेश आहे.

केंद्र सरकारने एकाच वेळी महागाई भत्ता पुन्हा सुरु करण्याचा आणि महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्याने या कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात चांगलीच वाढ होणार आहे. आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना १७ टक्के महागाई भत्ता देण्यात येत होता. मात्र आत्ताच्या ४ टक्के वाढीसह महागाई भत्ता २१ टक्के झाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

केंद्र सरकारच्या कॅबिनेटने मार्च २०२० मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना अधिकचा महागाई भत्ता देण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली होती. या निर्णयाची अंमलबजावणी १ जानेवारी २०२० पासून करण्यात येणार आहे. अर्थमंत्र्यांनी स्वतः सध्याची महागाई लक्षात घेता कर्मचाऱ्यांना ४ टक्के अधिकचा महागाई भत्ता देण्याची माहिती दिली. या निर्णयाचा फायदा निवृत्त झालेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना देखील होणार आहे, हे उल्लेखनीय. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी डीएचा १२ हजार ५१० कोटींचा आणि डीआरचा १४ हजार ५९५ कोटींचा (आर्थिक वर्ष २०२०-२१ ) मध्ये बोजा पडणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER