सख्खे मित्र…पक्के वैरी

Visraj Kulkarni & Akshay Kulkarni

खऱ्या आयुष्यात असलेले नाते कलाकार म्हणून पडद्यावर वेगळ्याच रूपात निभवायला लागतं तेव्हा खरंच खूप मजा येते आणि मग ऑन स्क्रीन दिसणाऱ्या गोष्टी वेगळ्याच दिसतात. जे पडद्यावर करता येत नाही ती धमाल शॉटच्या ब्रेकमध्ये मस्तीच्या रूपाने केली जात असते. माझा होशील ना या मालिकेतील आदित्य म्हणजे विराजस कुलकर्णी आणि डॉक्टर सुयश म्हणजेच आशय कुलकर्णी मालिकेत जरी एकमेकांचे पक्के वैरी दिसत असले तरी खऱ्या आयुष्यात हे दोघं अत्यंत जिवाभावाचे मित्र आहेत. त्यामुळे मालिकेत सीन करताना ते दुश्मन असतात. दुश्मनी करण्याचे सीन कधी संपतात याची हे दोघेही वाट बघत असतात आणि मग ऑफ स्क्रीन त्यांची धमालमस्ती सुरु असते. या सगळ्या धमाल-मस्ती चे फोटो त्यांचे चाहते नेहमी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर पाहत असतात त्यामुळे या दोघांनाही कॅमेर्‍यासमोर दुश्मनी करायला आणि कॅमेरा मागे मैत्री निभवायला खूपच मजा येते.

माझा होशील ना या मालिकेने काही दिवसातच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णी याची ही पहिलीच मालिका आहे. मालिकेत पहिल्यांदा काम करत असला तरी विराजस एक उत्तम लेखक दिग्दर्शक आणि हौशी रंगभूमीवरचा कलाकार आहे. त्याने पुण्यात अनेक प्रायोगिक नाटकं केली आहेत. कॉलेज च्या दिवसापासून तो रंगभूमीची जोडला गेला आहे. आणि याच काळामध्ये आशय कुलकर्णी हा देखील रंगभूमीवरचा कलाकार असल्याने या दोघांची मैत्री झाली . या दोघांनी अनेक नाटके देखील एकत्र केली आहे ज्यामध्ये डावीकडून चौथी बिल्डिंग हे ह्या दोघांचं नाटक खूप गाजलं होतं. दोघेही पुणेकर असल्यामुळे पुण्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने नाटकाच्या निमित्ताने सतत भेटत होते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे दोघांनाही मजा आली ती दोघांची पहिली मालिका एकत्र करत आहेत. आणि तिचं नाव आहे माझा होशील ना .

या दोघांना जर आपण पाहिलं तर सेटवर सीनमध्ये मिळालेल्या ब्रेकमध्ये या दोघांची सतत काही ना काही मस्ती सुरू असते. ग्रुप मध्ये देखील दोघे सतत एकमेकांचे फोटो काढून शेअर करत असतात. दोघांचं नातं इन्स्टा पेजवर फोटोमधून पाहिलं की असं वाटतं की मालिकेमध्ये दिसणारी त्यांची दुश्मनी आणि ऑफ स्क्रीन मैत्री साकारताना त्याने किती कष्ट पडत असतील.

माझा होशील ना या मालिकेमध्ये ऑन स्क्रीन विराजस आणि आशय यांच्या भूमिका या एकमेकांच्या विरोधात असलेल्या व्यक्तिरेखांच्या रुपात दाखवण्यात आल्या आहेत. प्रेमाचा त्रिकोण सध्या या मालिकेत सुरू असून आदित्य आणि सुयश यांची जुगलबंदी रंगली आहे. विराजस सांगतो, या मालिकेच्या निमित्ताने मी आणि आशय बऱ्याच वर्षांनी एकत्र काम करत आहोत. यापूर्वी आम्ही नाटक, एकांकिका या माध्यमात बरेच वर्षे एकत्र काम केलं आहे मात्र मालिकेमध्ये आम्हाला एकमेकांसमोर पहिल्यांदाच काम करण्याची संधी मिळत आहे. पडद्यावर मालिकेच्या सीन मध्ये खुन्नस दिसत असली तरी आम्ही खूप चांगले मित्र आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखत असल्यामुळे आमची केमिस्ट्री खूप चांगली आहे अर्थात मालिकेमध्ये आमची केमिस्ट्री ही मित्र म्हणून नव्हे तर शत्रू म्हणून आम्हाला रंगवायची होती. त्यामुळे खरंच हे असे आव्हान होतं की ऑफ कॅमेरा आम्ही खूप चांगले मित्र आहोत पण कॅमेरासमोर आम्हाला सगळ्यात जास्त दुश्मनी असल्यासारखं वागायचं होतं त्यामुळे आम्हाला तर या दोन्ही व्यक्तिरेखा करताना खूप मजा आली.

आशय सांगतो, मालिकेत काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ असली तरी यापूर्वी विराजस सोबत खूपदा रंगमंच शेअर केला आहे. अनेकदा असं होतं की माझा होशील ना या मालिकेच्या एखाद्या सीनसाठी रिहर्सल करत असताना आम्हाला एकमेकांना इतक पाण्यात बघायचं असतं की त्याचं आम्हाला हसू येतं पण जेव्हा सीन होतो तेव्हा आम्ही अगदी जिवश्च कंठश्च मित्र होतो. आम्हाला एकमेकांच्या खूप सार्‍या गोष्टी माहिती आहेत आणि एकमेकांनी अभिनयाच्या सुरुवातीच्या काळामध्ये एकत्र काम केले आहे या क्षेत्रांमध्ये कसा संघर्ष असतो हे आम्ही पाहिले आहे. त्यामुळेच ही मालिका करत असताना आमच्या मध्ये एक छान गिव्ह अँड टेक तयार होतं आणि याची नक्कीच आम्हाला या दोन्ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खूप मदत झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER