
कोल्हापूर : कोल्हापुरातील राजर्षी छ. शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन (अधिष्ठाता) डॉ. मीनाक्षी गजभिये यांची आज (शुक्रवारी) तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. रामानंद हे सध्या धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालयात काम करीत आहेत.
गजभिये यांची आता जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन इन्स्टिट्यूटचे संचालक आणि कोविड -१९ राज्य नोडल अधिकारी डॉ. तात्याराव लहाने यांनी आज काही वेळापूर्वी आदेश पारित केला. विशेष म्हणजे या अधिकाऱ्यांना उद्याच (शनिवारी) नवीन पदाचा कार्यभार स्वीकारावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला