सांगलीत तरुणावर प्राणघातक हल्ला

सांगली : शहरातील विश्रामबागमधील शंभरफुटी रस्त्यावर रविवारी रात्री पूर्ववैमान्यस्यातून तरूणावर लाकडी दांडक्याने आणि चाकूने हल्ला झाल्याचा गंभीर प्रकार घडला. जखमी तरुणाला दूचाकीवरुनच शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्याला आणि छातीच्या बाजूला जखमा झाल्याचे दिसत होते. रात्री उशीरापर्यंत या घटनेची नोंद पोलीसात झाली नव्हती. पोलीसांनी घटनास्थळी तर जखमी तरुणाच्या नातेवाईकांसह मित्रांनी शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतली होती.

शंभरफुटी रस्त्यावरील एका पानपट्टीनजिक जखमी तरूण रविवारी सायंकाळी आपल्या मित्रांसह गप्पा मारत थांबला होता. त्या परिसरात खाद्यपदार्थांचे हातगाडेही अधिक सं‘येने आहे. शासकीय वसतीगृहासमोरचा हा परिसर असून सात वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी वाद उफाळून आला. आपल्या भावाला पूर्वी झालेल्या मारहाणीच्या कारणावरुन निर्माण झालेला वाद टोकाला जाताच काहीजणांनी जखमीवर हल्ला केला. लाकडी दांडके आणि कांदा कापण्याच्या चाकूने हल्ला झाल्याने जखमी झालेल्या तरुणाला त्याच्या मित्रांनी दूचाकीवरुनच शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. रात्री उशीरापर्यंत घटनेची नोंद करण्यात आली नव्हती.