डेडलाईन संपली! उद्यापासून भारतात Facebook, WhatsApp, Twitter आणि Instagram होणार बॅन?

Whatsapp - Instagram - Facebook - Twitter

नवी दिल्ली :- सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Facebook, WhatsApp, Twitter आणि Instagram उद्या म्हणजे २६ मेपासून बॅन होण्याची शक्यता आहे! कारण, केंद्र सरकारच्या नव्या ‘इंटरमीडियरी गाईडलाईन’ला मंजुरी देण्याची मुदत आज (२५ मे) रात्री संपते आहे. त्यामुळे Facebook, WhatsApp, Twitter आणि Instagram यावर २६ मेपासून प्रतिबंध लागू होऊ शकतात.

Facebook ची तयारी
डेडलाईनची मुदत संपण्याआधी Facebook ने एक निवेदन प्रकाशित करून, आम्ही सरकारच्या नव्या डेडलाईनचा सन्मान करतो, असे जाहीर केले आहे. या गाईडलाईन लागू करण्याचे काम सुरू आहे, याबाबत सरकारशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती दिली. Twitter ने यासाठी सहा महिने वेळ मागितला आहे.
केंद्राने तीन महिन्यांपूर्वी जाहीर केल्या होत्या गाईडलाईन्स

केंद्र सरकारने फेब्रुवारी २०२१ ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी नव्या गाईडलाईन्स जाहीर केल्या होत्या. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेसन टेक्नोलॉजीने (MEITy) या गाईडलाईन्स लागू करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ दिला होता. Twitter चा पर्याय असलेला भारतीय Koo हा सोशल मीडियाचा एकमेव असा प्लॅटफॉर्म आहे की ज्याने या नव्या गाईडलाईन्स लागू केल्या आहेत. २५ मेपर्यंत या गाईडलाईन्स लागू न करणाऱ्या सोशल प्लॅटफॉर्मविरुद्ध कारवाई होणार आहे.

युजर्सची संख्या
सरकारी आकडेवारीनुसार भारतात WhatsApp चे ५३ कोटी, Youtube चे ४४.८ कोटी आणि Facebook चे ४१ कोटी युजर आहेत. इन्स्टाग्रामचे २१ कोटी क्लायंट आहेत आणि Twitter चे १.७५ कोटी अकाउंट होल्डर आहेत तर Koo ऍपचे ६० लाखांपेक्षा जास्त युजर्स आहेत.

नव्या गाईडलाईन्स

  • सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भारतात नोडल ऑफिसर, रेसिडेंट ग्रीव्हन्स ऑफिसर नियुक्त करावे लागतील. त्यांचे निवासस्थान भारतात असेल. ओटीटी कंटेंटविरुद्धच्या तक्रारींचे निवारण या अधिकाऱ्यांना १५ दिवसांत करावे लागेल.
  • सोशल मीडियाला तक्रारी आणि त्याबाबत केलेल्या कारवाईची माहिती असलेला अहवाल दरमहिन्याला जाहीर करावा लागेल. याशिवाय कोणत्या पोस्ट आणि कंटेंट हटवल्या आणि का हटवल्या याची सविस्तर माहिती द्यावी लागेल. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा भारतातला फिजिकल पत्ता असावा आणि तो कंपनीच्या मोबाईल ऍप आणि वेबसाईटवर नोंद असावी.
  • आपत्तिजनक कंटेंट तक्रार मिळाल्यानंतर २४ तासांत हटवावे लागतील. २४ तासांत तक्रारीची नोंद आणि १५ दिवसांत तक्रारींचे निवारण झाले पाहिजे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button