पश्चिम बंगाल; भाजपाच्या आमदाराचे प्रेत सापडले

BJP MLA

दिनाजपूर : पश्चिम बंगालमधील भाजपाचे आमदार देवेंद्र नाथ रे यांचे प्रेत बिंदल गावात लटकलेले आदळले. यामुळे खळबळ उडाली आहे. एका दुकानाच्या बाहेर देवेंद्र नाथ यांचे प्रेत लटकले होते. ही हत्या आहे, असा आरोप भाजपाने केला आहे.

देवेंद्र नाथ यांचे प्रेत घरापासून एक कि. मी. दूर आढळले आहे. देबेंद्र यांच्या एका नातेवाईकाने सांगितले की, काही लोक मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घरी आले आणि देवेंद्र नाथ यांना सोबत घेऊन गेले. याप्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी देवेंद्र नाथ यांचा कुटुंबियांनी केली आहे.

सकाळी काही लोकांना देवेंद्र यांचे प्रेत दुकानाबाहेर लटकलेले दिसले. पोलिसांना कळवण्यात आले. भाजपाने देवेंद्र यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ट्विट केले असून ममता बॅनर्जी सरकारवर टीका केली आहे.

नड्डा ट्विटमध्ये म्हणाले की, “संशयितरित्या अत्यंत क्रूरपणे देवेंद्र नाथ रे यांची करण्यात आलेली हत्या अत्यंत धक्कादायक आहे. यावरुन ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील गुंडाराज आणि कायदा सुवस्था ढिसाळ असल्याचे स्पष्ट होते.”

देवेंद्र नाथ रे यांनी २०१६ मध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव जागेवरुन सीपीएमच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिलेला होता. पण गतवर्षी लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. पोलीस सध्या याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

ट्वीटमध्ये भाजपाने दावा केला आहे की, ‘उत्तर दिनाजपूरची राखीव जागा असलेल्या हेमताबाद येथील भाजपचे आमदार देबेन्द्र नाथ रे यांचा मृतदेह त्यांच्या गावाजवळ बिंदल येथे लटकलेला आढळला होता. लोकांचे म्हणणे आहे की, प्रथम त्यांची हत्या करण्यात आली आणि नंतर लटकवण्यात आले.’ तसेच त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला हाच त्यांचा गुन्हा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER