प्रतिस्पर्ध्यांसाठी धोक्याची घंटा, डीविलीयर्स टी-20 विश्वचषक खेळणार?

Maharashtra Today

आपल्या तडाखेबंद फलंदाजीने आयपीएल (IPL) गाजवत असलेला मिस्टर 360 (Mister 360) अर्थात एबी डी’विलियर्स (A.B.de Villiers) पुनरागमनाच्या मार्गावर आहे. यंदाच्या टी-20 विश्वचषक (T-20 World Cup) स्पर्धेत तो खेळेल अशी शक्यता आहे. सध्या पराभवांच्या मालिकेत अडकलेल्या दक्षिण आफ्रिकन (South Africa) संघासाठी ही जेवढी आनंदाची बाब आहे तेवढीच इतर संघांसाठी धोक्याची घंटा आहे कारण एबीडीचे खेळणे म्हणजे काय असते ते सांगण्याची गरज नाही. पुनरागमनासंदर्भात आपण दक्षिण आफ्रिकन संघाचे प्रशिक्षक मार्क बाऊचर यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्याने म्हटले आहे.

डीविलीयर्सने मे 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मी फलंदाजी कुठेही व कोणत्याही क्रमांकावर करो, पण मला माझ्या संघासाठी सामने जिंकायचे आहेत असे डीविलीयर्सने म्हटले आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धा यंदा भारतात खेळली जाणार आहे.

डीविलियर्सला पुन्हा दक्षिण आफ्रिकन संघाकडून खेळायची इच्छा असली तरी आपल्याला संघात स्थान मिळू शकेल का, याबाबत तो साशंक आहे. बाऊचरसोबत चर्चा सुरू आहे. आयपीएलदरम्यान आम्ही पुन्हा चर्चा करणार आहोत. गेल्यावर्षीच त्याने मला विचारले होते की तुझी तयारी आहे का, त्यावेळी मी त्याला निश्चितच असे म्हणालो होतो. आता आयपीएल संपल्यानंतर माझा फॉर्म व माझा फिटनेस याची समिक्षा करुन आम्ही निर्णय घेवू.अर्थात हे करताना संघातील विद्यमान खेळाडूंचाही विचार करावा लागणार आहे आणि ते जर चांगली कामगिरी करत असतील आणि त्यामुळे मला संघात जागा मिळत नसेल तर हरकत नाही. त्यामुळे आयपीएलनंतर बाउचरशी चर्चा होण्याची मी वाट बघतोय असे त्याने म्हटले आहे.

दक्षिण आफ्रिकन संघाने अलीकडेच पाकिस्तानविरुध्दची टी-20 मालिका 1-3 अशी गमावली. त्यानंतर बाउचर म्हणाले होते की डीविलियर्सशी ते बोलले असून आमची चर्चा अजून खूली आहे.

डीविलीयर्सने निवृत्तीनंतर संघात परतण्याचा 2019 च्या वन डे विश्वचषक स्पर्धेवेळीसुध्दा प्रयत्न केला होता पण त्यावेळी त्याला संघात स्थान दिले गेले नव्हते. त्या विश्वचषक स्पर्धेनंतर डीविलीयर्सने 41 टी-20 सामने खेळले असून त्यात 162.55 च्या स्ट्राईकरेटने धावा केल्या आहेत. त्यात 15 अर्धशतकं आहेत. गेल्यावर्षीच्या आयपीएलमध्ये त्याने पाच अर्धशतकांसह 454 धावा केल्या होत्या आणि यंदा तीन सामन्यात त्याने 62.50 ची सरासरी व 190 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. रविवारीच त्याने ज्या चेन्नईच्या चेपॉक खेळपट्टीवर धावा जमवणे अवघड जाते अशी चर्चा आहे तिथे केकेआरविरुध्द 34 चेंडूतच 76 धावांची 223 च्या स्ट्राईक रेटची भन्नाट खेळी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button