त्या प्रसिद्धीपत्रकाने वाढविला पगार कपातीबाबत गोंधळ

Ashish-Uddhav-Ajit- Nitesh

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी कर्मचारी-अधिकारी संघटनांच्या प्रतिनिधींची एक बैठक घेतली. कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत त्या बैठकीत काही निर्णय झाले. मात्र या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री पवार यांच्या कार्यालयाने प्रसिद्धीपत्रक काढले त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. शेवटी या गोंधळावर सायंकाळ होता होता सरकारने पडदा टाकला.

अधिकारी, कर्मचार्‍यांच्या पगारात तसेच मुख्यमंत्र्यांच्या तसेच सर्व लोकप्रतिनिधींच्या पगार/मानधनात अनुक्रमे 50%, 25 टक्के आणि 60 टक्के कपात करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रक उपमुख्यमंत्री कार्यालयाने दुपारी काढले होते.जीआरमध्ये कपात नाही दोन टप्प्यात पगार देऊ असे स्पष्ट करण्यात आले. उपमुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्धीपत्रक काढण्याची घाई केली नसती तर पुढचा प्रसंगच उद्भवला नसता. पगार कपात करणार या सदर प्रसिद्धीपत्रकाचा आधार घेऊन भाजपचे नेते आशिष शेलार, आमदार नितेश राणे यांनी सरकारला झोडपून काढले.

ही कपात नाही तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित रक्कम दिली जाईल असे उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या पहिल्या प्रसिद्धीपत्रकात कुठेही म्हटलेले नव्हते. सायंकाळी अजित पवार यांनी खुलासा केला ही पगार कपात नाही पगार आम्ही दोन टप्प्यात देणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही सायंकाळी अजित पवार यांच्या मदतीला धावले कोणाचीही पगार कपात केली जाणार नाही फक्त दोन टप्प्यात पगार देणार आहोत आणि ते लवकरात लवकर दिले जातील असा दिलासा ठाकरे यांनी दिला. मात्र पगार कपातीच्या प्रसिद्धीपत्रकाने दिवसभर सोशल मीडियात महाविकास आघाडी सरकारला ट्रोल करण्यात आले.


Web Title : DCM pawar office press release created confusion about salary deductions

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)