भाजपाचे नेते तोंडाला येईल ते बोलतात, चंद्रकांत पाटील बावचळले आहेत : अजित पवार

Ajit Pawar - Chandrakant Patil

मुंबई :- भाजपाचे (BJP) नेते तोंडाला येईल ते बोलत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे तर बावचळले आहेत अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. नांदेडमध्ये मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते .

भाजपाचे नेते कार्यकर्ते कुठे जाऊ नयेत म्हणून महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) पडेल असे म्हणत आहेत. महाविकासआघाडी सरकार चालवताना काहीवेळा अडचणी येतात. पण थोडे मागे-पुढे करुन निर्णय घ्यावे लागतात. राज्याचे हित हेच आमचे एकमेव धोरण आहे. आजवर महाराष्ट्र कधी दिल्लीश्वरांपुढे झुकला नाही, असेही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

ही बातमी पण वाचा : पवारांचं राजकीय कौशल्य खरोखर मोठं, त्यांच्यावर पीएचडी करतोय – चंद्रकांत पाटील

यावेळी अजित पवार यांनी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले. काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेना (Shiv Sena) हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. माझ्या ३० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी असं कधी पाहिलं नव्हतं. तिन्ही पक्षांनी एकत्र बसून जागावाटप केलं. त्यामुळे आता व्यक्तिगत हेवेदावे करुन वातावरण गढूळ करण्याची आवश्यकता नाही. आपल्या पक्षाच्या वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयाचे पालन करणे हे कार्यकर्ता म्हणून आपले कर्तव्य असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : भाजप सर्वाना पुरून उरली : म्हणूनच थयथयाट चंद्रकांत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER