पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले ….

मुंबई : पूजा चव्हाण (Pooja Chavan) या तरूणीने आत्महत्या (suicide case) केली होती. आत्महत्या कऱणाऱ्या तरूणीचा विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा होत आहे. यावर विरोधी पक्षानेही महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर टीका केली होती. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी चौकशी होऊ द्या, चौकशीनंतर काय ते समोर येईल, असं अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवरही निशाणा साधला.

राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ज्यांनी आरोप केला होता त्यांनी नंतर स्वतः चॅनेलसमोर येऊन मी कुठल्याही दबावाला बळी न पडता माझं स्टेटमेंट करतेय असं सांगितंल होतं. एखाद्या नेत्याला राजकीय उंची गाठण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. मात्र आरोप करणारा कशाही पद्धतीने आरोप करू शकतो, असे अजित पवार यांनी म्हटले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER