ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक बासू चटर्जी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

Ajit Pawar - Basu Chatterjee

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक बासू चटर्जी साहेबांचं निधन हे माझ्यासारख्या असंख्य चित्रपट रसिकांसाठी मोठा धक्का आहे. मध्यमवर्गीय माणसाच्या जीवनातही रंजकता असते. त्यांच्यातही ‘हिरो’ लपलेला असतो आणि तो लोकांना आवडू शकतो हे बासू चटर्जी साहेबांनी दाखवून दिलं. त्यांनी दिग्दर्शित केलेले उस पार, चितचोर, पिया का घर, खट्टा मीठा, रजनीगंधा, छोटीसी बात, एक रुका हुवा फैसला, चमेली की शादी, बातों बातो में- यासारखे चित्रपट हे भारतीय चित्रपटसृष्टीतील अमर कलाकृती आहेत. या चित्रपटांच्या माध्यमातून ते आपल्याला सदैव निखळ आनंद देत राहतील. बासू चटर्जी साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER