पत्रकार रायकर मृत्युप्रकरण : उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून चौकशीचे आदेश

Ajit Pawar-Pandurang Raikar

पुणे : पुण्याचे टीव्ही पत्रकार पांडुरंग  रायकर (Pandurang Raikar) यांचा मृत्यू हलगर्जीमुळेच झाला, असे सांगत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. अजित पवारांनी विभागीय आयुक्तांकडे अहवाल मागितला आहे.

ही बातमी पण वाचा:- पुण्यात युवा पत्रकाराचा कोरोनाने मृत्यू, आरोग्य यंत्रणेचे निघाले धिंडवडे

आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीही रायकर यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी केली जाईल व पुणे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांकडे ही जबाबदारी सोपवल्याचे टोपे यांनी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्युप्रकरणात चौकशी केली जात आहे.

कोविड काळात काम करताना कोणी दगावला तर त्याला मदत केली जाईल. पत्रकार जीव धोक्यात टाकून काम करत आहेत. रायकर यांच्या परिवाराला विम्याची मदत मिळवून द्यायचा प्रयत्न करू, असे आश्वासन राजेश टोपे यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER