
रायगड : मास्क वापरा, (face mask) कठोर निर्णय घेण्याची वेळ आणू नका , असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे. ते रायगडमध्ये बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नाव्हाशेवा पाणीपुरवठा योजना भूमीपूजन सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. कोरोना वाढत आहे, पण विकासकामंही सुरु आहेत. केंद्राकडून जीएसटीचे पैसे येणे बाकी आहेत, मात्र पायाभूत सुविधांमध्ये कोणतीही तडजोड अर्थात कॉम्प्रमाईज करत नाही, असे अजित पवारांनी सांगितले .
अजित पवार म्हणाले, 1 फेब्रुवारी पासून कोरोनाने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे कार्यक्रम हे साधेपणाने घ्यावे लागत आहेत. राज्यात कोरोनाचं प्रमाण वाढलं आहे. कोरोनामुळे सर्व कार्यक्रम साधेपणाने साजरे करा, प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन पुढे जायचं आहे. सर्व विकासकामं जोरात सुरु आहेत, पाणी हे जीवन आहे, त्याचा योग्य वापर करा, पाण्याचा तुटवडा लक्षात घेऊन हा प्रकल्प सुरु केला, असे अजित पवार म्हणाले .
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला