पुण्यात अजितदादांची अधिकाऱ्यांसोबत बैठक, चंद्रकांतदादांनाही बोलावले;लॉकडाऊनसंदर्भात चर्चा

ajit-pawar-Chandrakat Patil

पुणे : राज्यात कोरोनाचे संकट (Corona Crises) दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. यापार्श्वभूमीवर पुणे हे पुन्हा एकदा कोरोनाचे हॉटस्पॉट ठरतं का? अशी शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

याच पार्श्वभूमीवर पुण्यात लॉकडाऊन (Pune Lockdown) करायचा की नाही याबाबत आज निर्णय घेण्यात येणार आहे.पुण्यात आज उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत कोरोना आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमुळे पुण्यात लॉकाडाऊन लागण्याच्या हालाचलींनी वेग आला आहे.

या बैठकीपूर्वी भाजप नेते चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्या दोघांमध्ये लॉकडाऊन, वाढता कोरोना या विषयांवर चर्चा केल्याचे बोललं जात आहे. तसेच पुण्यात लॉकडाऊन लावायचा की नाही याबाबतही त्यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती कोरोना आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त उपस्थितीत राहणार आहे. पुणे पालिकेच्या विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक होणार आहे. सकाळी 10 वाजता ही बैठक होईल. या बैठकीला पुण्यातील लॉकडाऊनबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

अजित पवारांनी आयोजित केलेल्या बैठकीत पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोनाचा आढावा घेतला जाणार आहे. या ठिकाणी किती कोरोना रुग्ण आहेत, मृत्यू किती आहे? याचा आढावा घेतला जाईल. सध्या पुण्यात 62 कंटेन्मेंट झोन आहेत. या झोनमध्ये कडक निर्बंध लावण्याची शक्यता आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER