‘सुपर ओव्हर’ मध्ये दिल्ली आणि हैदराबाद एकमेकांच्या ‘परफेक्टली अपोझीट’

Maharashtra Today

यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL). अटीतटीचे सामने असे होतच नव्हते पण रविवार याला अपवाद ठरला आणि दिल्ली कॕपिटल्स (DC) व सनरायझर्स (SRH) दरम्यानचा सामना ‘टाय’ (Tie) झाला. एवढच नाही तर सुपर ओव्हरमध्येही अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला आणि सामन्यातील अखेरच्या चेंडूवर शिखर धवन व रिषभ पंत यांनी कशीतरी एक धाव घेत दिल्लीला विजय मिळवून दिला.

यासह दिल्लीने आयपीएलच्या ‘टाय’ सामन्यांमध्ये सुपर ओव्हरसह (Super Over) सामने जिंकायची हॕट्ट्रीक (Hattrick) साजरी केली आणि योगायोगाने त्यांच्या प्रतिस्पर्धी संघाचीही सुपर ओव्हरसह सामना गमावण्याची हॕट्ट्रीक साजरी झाली. विशेष म्हणजे या दोन्ही संघाचेही सलग गेल्या तीन आयपीएलमधील हे सामने आहेत.

दिल्ली कॕपिटल्सने 2019, 2020 आणि आता 2021 चे आपले सुपर ओव्हरचे सामने जिंकले (विरुध्द केकेआर, पंजाब किंग्ज आणि आता सनरायझर्स हैदराबाद) आहेत. दुसारीकडे सनरायझर्स हैदराबादनेसुध्दा 2019 2020 आणि आता 2021 च्या आयपीएलमध्ये सुपर ओव्हर सामने खेळले पण दुर्देवाने ते तिन्ही गमावले ( विरुध्द मुंबई, कोलकाता आणि दिल्ली).

गंमत म्हणजे या दोन्ही संघांनी आयपीएलमध्ये प्रत्येकी चार सामने सुपर ओव्हरचे खेळले आहे आणि त्यांच्या पहिल्या ‘टाय’ सामन्याचा निकाल नेमका नंतरच्या तीन सामन्यांच्या उलट राहिला होता. नंतरचे ओळीने तिन्ही टाय सामने जिंकणाऱ्या दिल्लीने असा पहिला सामना 2013 मध्ये गमावला (वि. आरसीबी) होता. आणि ज्या सनरायझर्स हैदराबादने आता ओळीने तीन सुपर ओव्हर गमावले आहेत त्यांनी त्यांचे पहिले सुपर ओव्हर 2013 मध्ये जिंकले (वि. आरसीबी) होते. योगायोगाने हे दोन्ही सामने 2013 मधील आणि आरसीबी विरुध्दचेच होते.

सनरायझर्ससाठी तर ओळीने गमावलेल्या या तिन्ही सामन्यात धावसंख्याही जवळपास सारखीच (162, 163 आणि आता 159) होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button