दया नायक मुंबईतून थेट गोंदियात, जिल्हा जात प्रमाणपत्र समिती येथे बदली

Daya Nayak - Maharashtra Today

मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची बदली करण्यात आली आहे. दया नायक यांना दहशतवादी विरोधी पथकातून थेट गोंदियात पाठवण्यात आलं आहे. एटीएसमध्ये दया नायक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यानंतर आता नायक यांची बदली गोंदियामध्ये जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या उपसंचालकपदी करण्यात आली आहे. त्यामुळे दया नायक यांना साईडलाईन केल्याचं चित्र आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेल्या दया नायक यांची बदली प्रशासकीय कारणास्तव केल्याची माहिती सांगितली जात आहे.

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही त्यावेळी धमकीचा फोन गेला होता. त्यानंतर एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक तपास करत कोलकाताहून आरोपीस अटक केली होती असल्याची माहिती देण्यात आली.

दरम्यान, मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एटीएसमार्फतही करण्यात येत होता. एटीएस मार्फत या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सचिन वाझे हा या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एकूण ६ टीम बनवण्यात आल्या आहेत. त्यातील जुहू एटीएसच्या टीमचे प्रभारी इन्चार्ज म्हणून दया नायक काम बघत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button