वरुणचा राग सारावर काढला डेव्हिड धवनने

sara david varun

बॉलिवुडमध्ये (Bollywood) डेव्हिड धवनने (David Dhawan)एक काळ गाजवला होता. त्याचे जवळ-जवळ सर्व चित्रपट तूफान चालत असत. त्यामुळे त्याने आपला चित्रपट करावा म्हणून निर्माते त्याच्याकडे पैशाच्या थैल्या घेऊन उभे राहात असत. अनेक कलाकारही त्याच्यासोबत काम करण्यास एका पायावर तयार असत. मात्र गोविंदाबरोबर डेव्हिडचे ट्यूनिंग चांगले असल्याने या जोडीने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मात्र सेटवर डेव्हिड धवनचे वागणे प्रस्तुत प्रतिनिधीने पाहिलेले असल्याने तो कलाकारांना कसा वागवत असे ते चांगले ठाऊक आहे. त्यामुळेच जेव्हा सारा अलीने सेटवर डेव्हिड धवनने वरुण धवनचा राग माझ्यावर काढला तेव्हा त्यावर विश्वास ठेवावाच लागेल.

गेल्या काही काळात प्रख्यात दिग्दर्शक डेव्हिड धवन आपले जुने चित्रपटच नव्या रुपात घेऊन येत आला आहे. यावेळी गोविंदा आणि करिश्मा कपूर अभिनीत ‘कुली नंबर वन’ वरुण धवन आणि सारा अलीला घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे. तयार असलेला हा चित्रपट चित्रपटगृहे सुरु नसल्याने अखेर ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळचा किस्सा साराने सांगितला.

साराने सांगितले, ‘मैं तो रस्ते से जा रहा था’ गाण्याचे आम्ही शूटिंग करीत होतो. डेव्हिड धवन लवकर शूटिंगसाठी तयार व्हायला सांगत होता. मी तयार झाले होते. पण माझ्या कॉस्ट्यूमवर आणखी काही गोष्टी लावायच्या असल्याने त्याला उशीर होत होता. उशीर होत असल्याने रागावलेल्या डेव्हिड धवन सगळ्यांसमोर मला ओरडले, मला खूप वाईट वाटले होते. पण नंतर कळले की, खरे तर डेव्हिड धवन वरुण धवनवर नाराज होते. वरुण कॉस्ट्यूमवर काम करीत असल्याने त्याच्यामुळे उशीर होत होता. मात्र त्यांनी सगळा राग माझ्यावर काढला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER