दत्तात्रेय भरणे पीपीई कीट घालून कोविड वार्डात; हॉस्पिटलमध्ये रुग्णांची विचारपूस

Dattatray Bharane In Covid ward - Maharastra Today
Dattatray Bharane In Covid ward - Maharastra Today

सोलापूर : पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आज सोलापुरातील शासकीय रुग्णालयात जाऊन रूग्णांची भेट घेतली. यावेळी रुग्णांनी सिव्हीलमध्ये मिळत असलेल्या उपचारवरून समाधान व्यक्त केल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात मिळत असलेल्या उपचाराबाबत आणि स्वच्छतेबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे रुग्णालयात जाऊन रुग्णांशी संवाद साधला. यावेळी रुग्णांनी मिळत असलेल्या सेवेबाबत समाधान व्यक्त केले. शासकीय रुग्णालयातील मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. प्रसाद, डॉ. चिटणीस, डॉ. अग्रवालदेखील सोबत होते.

दत्तात्रेय भरणे यांनी अक्कलकोट येथे कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांविषयी आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोरोना विषाणूची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच लसीकरणाचा आढावा त्यांनी घेतला.

दत्तात्रेय भरणे दौऱ्यावर

पालकमंत्री दत्तात्रय भरणे कोरोना स्थितीचा आढावा घेत आहेत. शनिवारी त्यांनी बार्शी तालुक्यातील कोरोनाच्या अनुषंगाने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनाचा आढावा घेतला. बार्शीतील शासकीय आणि खासगी रुग्णालयात बेड्सची संख्या वाढविण्याबरोबरच ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करा, असे निर्देश भरणे यांनी दिले. बाहेरून येणाऱ्या रुग्णांना बार्शीत उपचार देता यावेत, यासाठी प्रयत्न करायला हवे. बार्शीत होम आयसोलेशनऐवजी रुग्णांना कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात यावा. त्यासाठीची प्राथमिक तयारी करण्यात यावी, अशा सूचनाही भरणे यांनी दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button