दत्तात्रय होसबळे संघाचे नवे सरकार्यवाह

Maharashtra Today

बेंगळुरू : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांचे निवड करण्यात आली. संघाच्या प्रतिनिधी सभेत होसबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. होसबळे यांचा सरकार्यवाहपदाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. यापूर्वी ते संघात सहसरकार्यवाह म्हणून होते. (Dattatreya Hosabale Replaces Bhaiyyaji Joshi as RSS sarkaryawah)

संघाच्या प्रतिनिधी सभेची बैठक बेंगळुरूमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. ही सभा पहिल्यांदाच नागपूरबाहेर झाली. विद्यमान सरकार्यवाह भैयाजी जोशी यांचा कार्यकाळ संपल्यामुळे ही निवडणूक झाली.

दत्तात्रय होसबळे यांचा जन्म कर्नाटकमध्ये झाला. एबीव्हीपी या विद्यार्थी संघटनेतून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. ते एबीव्हीपीचे दोन दशक संघटन महामंत्री होते. आता संघात सरकार्यवाह होते.

नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय

होसबळे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय समजले जातात. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांना पटण्याहून लखनऊला बोलावण्यात आले होते. या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER