दत्तात्रय भरणेंनी व्यक्त केली इच्छा, अन् क्षणार्धात लावली शरद पवारांनी ऑनलाइन हजेरी

Dattatreya Bharane-Sharad Pawar

इंदापूर : इंदापूरमध्ये (Indapur) विकास कामांचा ऑनलाईन उद्घाटन समारंभ सुरू होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार दत्तात्रेय भरणे (Dattatreya Bharane) यांनी या कार्यक्रमाला काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कामाच्या व्यापामुळे उपस्थित राहू शकले नाही, असे सांगितले. परंतू, ऑनलाईन पद्धतीने का होईना त्यांनी पुढील काळात नागरिकांना मार्गदर्शन करावे, अशी इच्छादेखील व्यक्त केली. मात्र, थोड्याच वेळात शरद पवारांनी ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमाला हजेरी लावली. यामुळे कार्यकर्ते व उपस्थितांमध्ये उत्साह संचारला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आयोजित केलेल्या इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे ऑनलाइन पद्धतीने हजेरी लावली.

दत्तात्रेय भरणे म्हणाले की, “कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे ऑनलाइन पध्दतीने विकास कामांची उद्घाटने करत आहोत. पुढील काळात पवार साहेबदेखील आगामी ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होऊन आपणास मार्गदर्शन करतील.” काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे ऑनलाइन पद्धतीने सहभागी होऊन तालुक्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER