भाषणादरम्यान मास्क घातला नसल्याने राज्यमंत्री भरणेंनी स्वतःहून भरला दंड

Dattatray bharne

पुणे : कोरोनाचे संकट अद्याप कायम आहे. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे. या नियमावलीचे पालन करताना नागरीक उदासीन असल्याचे दिसुन येते. मात्र, जंक्शन (ता. इंदापुर) येथील खासगी कार्यक्रमात भाषण सुरु असताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray bharne) यांचा तोंडावरील मास्क अनावधानाने निघाला. मात्र,त्याची जबाबदारी स्वीकारत राज्यमंत्री भरणे यांनी भाषणानंतर भरणे यांनी स्वत:हून विनामास्कचा शंभर रुपयांचा दंड (Pay Fine)लासुर्णे ग्रामपंचायतीकडे भरला. त्याची रीतसर पावती घेतली. कोरोनाच्या काळात भरणे यांनी आदर्श वस्तुपाठ मांडला आहे.त्याची आज सर्वत्र चर्चा होती.

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते जंक्शन येथील एका खासगी दुकानाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी काही नागरिक विनामास्क कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होते.राज्यमंत्र्यांच्या नजरेतुन हि बाब सुटली नाही. यावेळी भरणे यांनी नागरिकांना कोरोना अद्याप गेलेला नाही. आवश्यक नियमावलीचे पालन करा, सोशल डिस्टन्स पाळा, मास्क वापरा, असे आवाहन करत साद घातली. याचवेळी अनावधानाने भरणे यांच्या तोंडावरील मास्क खाली आला. मात्र, हीदेखील चूक आहे. मंत्र्यांनादेखील नियम बंधनकारक आहेत. याच जाणिवेतून भाषणानंतर भरणे यांनी स्वत:हून विनामास्कचा शंभर रुपयांचा दंड लासुर्णे ग्रामपंचायतीकडे भरुन त्याची रितसर पावती फाडली. गर्दी वाढत असताना कोरोना रोखण्यासाठी आवश्यक दक्षता घेण्याचे सामाजिक भान सर्वांनीच जपण्याची नितांत गरज आहे. राज्यमंत्री भरणे यांनी हा संदेश दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER