साहेब-दांदांनी पाठबळ दिल्यामुळे आमदार झालो; अजितदादांच्या सभेत दत्तामामा भावुक

इंदापूर :- इंदापूरला (Indapur) अजितदादांनी (Ajit Pawar) नेहमीच झुकतं माप दिलं. माझ्या घरात कोणताही राजकीय वारस नव्हता. पण, मी आज मंत्री झालो. तुम्ही फक्त निष्ठा ठेवा, स्वार्थासाठी इकडे तिकडे उड्या मारू नका. आयुष्यात काहीही नसतं, एकमेकांशी चांगलं वागा. हीच शिकवण वडिलांनी आणि पर्यायाने पक्षाने दिली. माझे वडील आज हयात नाहीत. साहेब, दादांच्या सभेला वडील नेहमी असायचे. अशी आठवण काढत सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्ता भरणे (Datta Bharne) अजितदादांच्या सभेत भावुक झाले. तसेच, मी आज मंत्री झालो; पण हे पाहायला वडील नाहीत, असे सांगत भरणे मामांनी भरसभेत आपले दुःखही व्यक्त केले.

विधानसभा निवडणुकीनंतर आज प्रथमच उपमुख्यमंत्री  अजित पवार इंदापूरच्या दौ-यावर गेले. या दौऱ्यात अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी दत्ता भरणे यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला व पवार कुटुंबाचे भरभरून कौतुक केले.

“तुम्ही पाठबळ दिल्यामुळे आमदार झालो.  साहेब, दादा, ताईंमुळे मंत्री झालो. कोरोनाचं मोठं संकट असल्यामुळे गेलं वर्षभर एकही जाहीर कार्यक्रम झाला नाही. अनेक बॅंका कर्ज देतात, पण पुणे जिल्हा बॅंक हीच गोरगरिबांची बॅंक आहे. इंदापूरच्या नगरपरिषदेत सत्ता नसतानाही ३३ कोटी निधी दिला. मागच्या पाच वर्षांतही इंदापूरसाठी १३६० कोटी रुपये निधी आणला. कोविडचं संकट असतानाही रस्त्यांसाठी ५५० कोटी निधी दिला. ” असं दत्ता भरणे यांनी यावेळी सांगितले.

“मला आता फक्त काम करायचंय. कोणावर टीकाटिप्पणी करायची नाही.” असेही दत्ता भरणे म्हणाले.

ही बातमी पण वाचा : ‘तुम कुस्ती करो, हम कपडे संभालते हैं!’ असले  काही करु नका ;  अजितदादांचा सल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER