विठ्ठलाच्या महापूजेवेळी मुख्यमंत्र्यांसह दत्ता भरणेही असतील; अजित पवारांची सूचना

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये राज्यभरातून येणाऱ्या पालख्याना प्रवेशबंदी घातली आहे. गर्दी होऊ नये यासाठी केवळ मानाच्या पालख्याना एस. टी. बसच्या माध्यमातून पंढरपुरात नेल्या जात आहे. तर उद्या विठूरायाची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडणार आहे. मुख्यमंत्री, कुटुंबीय, मानाचा वारकरी आणि ठराविक पुजारी यांच्या उपस्थितीत शासकीय पूजा पार पाडणार आहे. तर ठाकरे सरकारमधील मंत्री दत्ता भरणे यावेळी उपस्थित असतील.

ही बातमी पण वाचा:- आषाढीनिमित्त आज मुख्यमंत्री सपत्नीक पंढरपुरात होणार दाखल 

विठूरायाची महापूजा करण्यासाठी मंत्र्यांना अनेक जणांचे फोन येत आहेत. मात्र कोरोनाच्या परिस्थितीत या शासकीय पूजेसाठी केवळ पालकमंत्री या नात्याने दत्ता भरणे हेच उपस्थित राहणार आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला सक्त ताकीद दिली आहे. मंदिर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे दत्ता भरणे वगळता इतर कोणालाच मंदिरात परवानगी देऊ नये, असं पवारांनी बजावून सांगितलं आहे. पालकमंत्री असल्याने त्यांना परवानगी द्यावी, अशी सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER