युवकांसाठी ‘डेटिंग डेस्टिनेशन’ आणि … , मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा

Congress

बडोदा : गेल्या काही वर्षांपासून गुजरातमध्ये निवडणुकीत सतत हारणाऱ्या काँग्रेसने (Congress) मनपाच्या निवडणुकीत तरुणांना आकर्षित करण्यासाठी कॉफी शॉप्स, डेटिंग डेस्टिनेशन (Dating Destination) (जोडप्यांसाठी हक्काची जागा) व महिलांच्या किटी पार्टीसाठी हॉल उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

हा तर इटलीचा प्रभाव! भाजपाची टीका

गुजरातमध्ये २१ फेब्रुवारीला महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी गुजरात काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसने इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करणे, निःशुल्क शिक्षण अशी आश्वासने दिली आहेत. तरुणांना आकर्षित करण्यासाठी कॉफी शॉप्स सुरू करण्यापासून डेटिंग डेस्टिनेशन म्हणजेच जोडप्यांसाठी हक्काची जागा सुरु करण्याचे आश्वासन आहे. काँग्रेसने मंगळवारी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसच्या या जाहीरनाम्यावर भाजपाने आक्षेप घेतला असून या घोषणापत्रावर इटली संस्कृतीचा प्रभाव असल्याची टीका केली आहे.

बडोदा शहर काँग्रेस अध्यक्ष प्रशांत पटेल यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. ते म्हणालेत की, समाजातील प्रत्येक वर्गातील नागरिकाचे आयुष्य सुखकर, तणावमुक्त आणि आरामदायी असावे हे लक्षात घेऊन जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. शहरातील कॅफेमध्ये जाणे श्रीमंतांना परवडतं मात्र गरीब घरातील तरुणाला ते परवडत नाही. काँग्रेसने जाहीरनाम्यासाठी लोकांकडून सूचना मागवल्या होत्या. यामध्ये तरुणांनी आम्हाला कॅफेमध्ये जाणे परवडत नाही असे म्हटले होते. या तरुणांच्या भावना लक्षात घेऊन कॅफेचा मुद्दा जाहीरनाम्यात समाविष्ट केला आहे.

‘डेटिंग डेस्टिनेशन’ बद्दल पटेल म्हणाले की नवविवाहीत जोडप्यांना किंवा दाम्पत्याला अनेक अडचणींबाबत घरी बोलता येत नाही, त्यांना एकांतात वेळ घालवता येत नाही अशा जोडप्यांसाठी डेटिंग डेस्टिनेशन सुरू करण्याचे आश्वासन आम्ही दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER