तारीख ठरली ; एकनाथ खडसें 17 ऑक्टोबरला राष्ट्रवादीत करणार राजकीय घटाची पुनर्स्थापना?

Eknath Khadse - Sharad Pawar

मुंबई : भाजपवर (BJP) नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) जाण्याचा निर्णय अखेर पक्का झाल्याची माहिती समोर येत आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाची तारीखही निश्चित झाली आहे. त्यानुसार 17 ऑक्टोबर म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात त्यादृष्टीने हालचालीही सुरु झाल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी आपल्या व्हॉटसअॅपला तसे स्टेटस ठेवले आहेत. यामध्ये ‘तुमचे राष्ट्रवादीत स्वागत आहे’, ‘आम्ही तुमच्या पाठिशी आहोत’, असा मजकूर पाहायला मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशासाठी वातावरणनिर्मिती करत असल्याचा अंदाजही तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे .

दरम्यान, भाजपच्या गोटातून सध्या एकनाथ खडसे यांची समजूत काढण्याचे प्रयत्नही सुरु आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER