महाराष्ट्रासह तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा उद्या जाहिर होण्याची शक्यता

ELECTIONCOMMISSION

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्रासह तीन राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा गुरुवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यातील विधानसभा निवडणुका या वर्षा अखेरीस निवडणुका पार पडणार आहेत. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये या दोन्ही राज्यांत पहिल्यांदा निवडणुका होतील. मात्र निवडणुकीसंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केलेली नाही. विधानसभा निवडणुकीच्या घोषणे संदर्भात उद्या केंद्रीय निवडणू्क आयोगाची बैठक देखील होणार आहे. या बैठकीत तिन्ही राज्यातील निवडणुकांची घोषणा कधी करायची यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. येत्या गुरुवारी म्हणजेच 12
तारखेलाच ही घोषणा केली जाऊ शकते असे सूत्रांकडून कळते.

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. तर हरिणाणा आणि झारखंडमध्ये प्रत्येकी 90 आणि 82 जागा आहेत. या तिन्ही राज्यात ऑक्टोबर 2014 विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. तर निकाल 19 ऑक्टोबर रोजी जाहीर झाले होते. तिन्ही राज्यातील विधानसभेचा कालावाधी लवकरच संपणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने देखील तयारी सुरु केली आहे.

तिन्ही राज्यात भाजपची सत्ता 2014 मध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तिन्ही राज्यांत झालेल्या
विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ता मिळवली होती. महाराष्ट्रातील 288 पैकी 122 जागा भाजपला मिळाल्या होत्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. हरियाणातील 90 पैकी 47 जागांवर भाजपने विजय मिळवला होता आणि मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले होते. झारखंडमध्ये 77 पैकी 35 जागांवर विजय मिळवत भाजपने सत्ता मिळवली होती आणि रघुबर दास हे मुख्यमंत्री झाले होते.