दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर

मुंबई :- दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे दरम्यान व दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान होणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली.

दहावीच्या परीक्षेचा निकाल जुलैच्या अखेरीस तर बारावीच्या परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस जाहीर होईल, असे त्या म्हणालात. गेल्या वर्षभरापासून देशासह राज्यात कोरोनाची साथ सुरू आहे.

त्यामुळे यंदाच्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे काय होणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला होता. परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्याने विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे.

मात्र, कोरोनामुळे परीक्षा नेमक्या कशा घेतल्या जाणार याबाबत अद्याप माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेणे कठीण असल्याचे मत शिक्षणमंत्र्यांनी व्यक्त केले होते. त्यामुळे परीक्षा ह्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरच जाऊन द्याव्या लागतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER