दासगुप्ता ‘टीआरपी’ घोटाळ्याचे ‘किंगपिन’ असावेत असे दिसते; जामीन नाकारताना सत्र न्यायालयाचे प्रथमदर्शनी मत

Das Gupta-Sessions Court

मुंबई :- ‘ब्रॉडकास्ट ऑडियन्स रीसर्च कौन्सिल’चे (Broadcast Audience Research Council- BARC)  माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पार्थो दासगुप्ता हे टीव्ही वाहिन्यांची दर्शकसंख्या गैरमार्गाने फुगवून दाखविण्याच्या घोटाळ्याचे  ‘म्होरके’ (King-Pin) असावेत असे प्रथमदर्शनी तरी वाटते, असा अभिप्राय सत्र न्यायालयाने दासगुप्ता यांचा जामीन फेटाळताना नोंदविला आहेजून २०१३ ते नोव्हेंबर २०१९ या काळात दासगुप्ता ‘बीएसआरसी’चे ‘सीईओ’ होते. ‘टीआरपी’ घोटाळ्यात २४ डिसेंबर रोजी अटक झाल्यापासून ते तळोजा कारागृहात आहेत. त्यांचा जामीन अर्ज १६ जानेवारी रोजी फेटाळताना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. ए. भोसले यांनी दिलेले सविस्तर निकालपत्र आता उपलब्ध झाले आहे. या निकालाविरुद्ध दासगुप्त्ता यांनी उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका केली असून पब्लिक प्रॉसिक्युटरने वेळ मागितल्याने न्या. पी. डी. नाईक यांनी त्यावरील सुनावणी ९ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे.

सत्र न्यायाधीश भोसले यांनी निकालपत्रात म्हटले आहे की, याच खटल्यातील इतर १४ आरोपींना महानगर दंडाधिकार्‍यांनी याआधीच जामीन दिला असला तरी माझ्या समोरील आरोपी दासगुप्ता हे या संपूर्ण गुह्याचे ‘मास्टरमाइंड’ असावेत व ‘वाहिन्यांना त्यांचे ‘टीआरपी’ हवे तसे बदलून देण्यासाठी त्यांनी आपल्या ‘सीईओ’ पदाचा दुरुपयोग केला असावा, असे या प्रकरणाच्या कागदपत्रांवरून प्रथमदर्शनी तरी वाटते.

पोलिसांनी या प्रकरणी जे ३,६०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे त्यात पार्थो दासगुप्ता आणि ‘रिपब्लिक टीव्ही’चे प्रधान संपादक अर्णब गोस्वामी यांनी परस्परांना पाठविलेल्या व्हॉट्सअ‍ॅप संदेशांचाही समावेश आहे. या संदेशांचा सखोल तपास करण्यासाठी दासगुप्ता यांचे कोठडीत ठेवूनच जबाब घेणे गरजेचे आहे, असे नमूद करून सत्र न्यायालय म्हणते की, हा ‘टीआरपी’हूनही अधिक व्यापक स्वरूपाचा घोटाळा असावा असे दिसते. या व्हॉट्सअ‍ॅप संदेशांमध्ये दासगुप्ता यांनी काही सांकेतिक शब्द (Code Words) वापरले आहेत. त्यांचा नेमका अर्थ काय हे फक्त तेच स्पष्ट करू शकतात.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER