‘टीआरपी’ घोटाळ्यातील आरोपी दासगुप्ता यांचा जामीन फेटाळला

Partho Dasgupta

मुंबई : टीव्ही वाहिन्यांची दर्शकसंख्या गैरमार्गाने फुगविण्याच्या ‘टीआरपी’ ( Televison Rating points) घोटाळ्यातील आरोपी व ‘ब्रॉडकास्ट ऑडियन्स रीसर्च कौन्सिल’चे ( Broadcast Audience Research Council-BARC)  माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता (Partho Dasgupta) यांचा जामीन अर्ज येथील सत्र न्यायालयाने बुधवारी फेटाळला. २४ डिसेंबर रोजी अटक झाल्यानंतर दासगुप्ता ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत होते. त्यानंतर ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

दासगुप्ता यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी युक्तिवाद सांपल्यानंतर राखून ठेवलेल्या निकाल सत्र न्यायालयाने लगेच बुधवारी जाहीर केला. आधी महानगर दंडाधिकाºयांनी जामीन नाकारल्याने दासगुप्ता सत्र न्यायालयात आले होते.

दासगुप्ता यांना जामीन देण्यास विरोध करताना विशेष पब्लिक प्रॉसिक्युटर शिशिर हिरे यांनी दासगुप्ता यांनी आपल्या पदाचा व़्यक्तिगत लाभासाठी दुरुपयोग केल्याचा दावा केला होता.

तसेच दासगुप्ता व ‘रिपल्बिक टीव्ही’चे प्रधान संपादक अर्णव गोस्वामी यांच्यातील अनेक व्हॉट््सअ‍ॅप चॅट्सचा संदर्भ ेदेत त्यांनी, ‘रिपब्लिक टीव्ही’चा ‘टीआरपी’ गैरमार्गाने वाढविण्याचे कारस्थान गोस्वामी व दासगुप्ता यांनी संगनमताने रचले, असा आरोपही हिरे यांनी केला होता. याचा प्रतिवाद करताना दासगुप्ता यांंचो वकील अ‍ॅड. अर्जून सिंग यांनी सांगितले होते की, ‘बीएआरसी’चे संचालक मंडळास निर्णय घेण्याचे अधिकार आहेत व दासगुप्ता या मंडळाचे सदस्यही नाहीत. त्यामुळे त्यांनी संगनमताने ‘टीआरपी’ वाढविला हे म्हणणे हास्यास्पद आहे. शिवाय दासगुप्ता यांची तब्येत ठीक नाही व आणखी तुरुंगात राहावे लागले तर कदाचित मधुमेहाचा तीव्र झटका येऊन ते ‘कोमा’तही जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER