शिवसैनिकाच्या शिवभक्तीचे दर्शन ; गेली 25 वर्षे अखंडपणे शिवरायांच्या पुतळ्याची निष्ठेने सेवा

Maharashtra Today

मुंबई : हिंदवी स्वराज्याची संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य श्री छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)यांचा 348 वा राज्याभिषेक सोहळा (आज) रविवारी किल्ले रायगडावर साजरा करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा जागर जगभरातील लाखो शिवप्रेमी विविध माध्यमातून घालत असतात. सामाजिक कार्यातून आपली बांधीलकी जपणारे धोंडीराम परीट निष्ठावंत शिवसैनिक (Shivsainik) आहेत. गेली 25 वर्षे अखंडपणे शिवरायांच्या पुतळ्याची निष्ठेने सेवा करत त्यांनी एक आदर्श समाजासमोर कायम ठेवला आहे .

परीट मुरगूड नगरपरिषदेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दररोज सकाळी मनोभावे सेवा करीत आहेत. 25 वर्षांपूर्वी छत्रपतींच्या पुतळ्याशेजारी बसलो असता पुतळा परिसरातील अस्वच्छता पाहून मन अस्वस्थ झाले.
तेव्हापासून पुतळा व परिसराची सेवा करण्याचा ध्यास घेतला. या सेवाव्रतामुळे वेगळेच समाधान लाभते, असे सांगणारे परीट पुतळ्याची स्वच्छता केल्याशिवाय आपला दिनक्रम सुरू करीत नाहीत. एकवेळ घरातील देवाची पूजा चुकेल, पण शिव पुतळ्याची व परिसराची स्वच्छता कधीही चुकणार नाही.

परीट यांनी शिवभक्तीच्या आपल्या उपासनेला सामाजिक कार्याची जोड दिली आहे. आपल्या व्यवसायातील कमाईतून थोडा वाटा आणि इतर शिवप्रेमींच्या सहकार्याने समाजातील गुणवंतांच्या सत्काराचा उपक्रमही अनेक वर्षे ते राबवित आहेत. त्यात सर्पमित्र, खेळाडू, आरोग्य कर्मचारी, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, वीरमाता-पिता, वीरपत्नी, अपंग व्यक्ती, डॉक्टर, ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक यांचा प्रामुख्याने समावेश असतो .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button