संतापलेला डॅरेन सामी म्हणतोय, मला ‘त्या’ शब्दाचा अर्थ आता समजलाय’

Darren Samy

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सामी याने इंडियन प्रीमीयर लीगमध्ये खेळताना आपल्यावरही रंगभेदी शेरेबाजी झाली होती असा गौप्यस्फोट केला आहे. सनरायझर्स हैदराबादसाठी खेळताना आपल्याला ‘कालू’ म्हटले जायचे. मला आता समजले की त्या कालू शब्दाचा काय अर्थ आहे. मला आणि परेराला ते त्या नावाने बोलवायचे. मला वाटायचे की ते ताकदवान घोड्याचे नाव असते. मात्र मला आता आता समजले की ‘कालू’ म्हणजे काय आणि ते समजल्यावर माझा संताप झाला आहे, असे सामीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.

आपल्या या आधीच्या पोस्टमध्ये त्याने म्हटले होते, “ओह, तर सनरायझर्ससाठी खेळताना ते मला आणि परेराला या अर्थाने कालू म्हणत होते.मला असे वाटायचे की ते मला एक मजबूत कृष्णवर्णी पुरुष या अर्थाने तसे म्हणायचे.”

सामीने याआधीच वर्णभेदाविरोधाता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) कडे रंगभेदाविरुध्द तक्रार केली आहे. आयसीसीने या प्रकाराकडे उघड्या डोळ्यांनी बघितले पाहिजे आणि त्याविरुध्द बोलले पाहिजे असे त्याने म्हटले आहे.

अमेरिकेतील जार्ज फ्लॉइड प्रकरणानंतर ब्लॅक लाईव्हज मॅटर या आंदोलनाबाबत बोलणारा सामी हा बहुधा पहिलाच क्रिकेटपटू आहे. ब्लॅक लाईव्हज मॅटर आंदोलनाबाबत त्याने ट्विटरवर म्हटलेय, “आयसीसी व इतर मंडळे, आमच्यासारख्या लोकांसोबत काय घडून राहिलेय, त्याकडे तुमचे लक्ष आहे का? आमच्यासारख्या लोकांविरुध्द होणाऱ्या सामाजिक अन्यायाविरोधात तुम्ही बोलणार आहात का? हे केवळ अमेरिकेपुरतेच नाही. हे दररोज घडतेय. आता शांत बसण्याची वेळ नाही.तुमचे म्हणणे मला ऐकायचे आहे.”

सामीने 38 कसोटी, 126 वन डे आणि 68 टी-20 इंटरनॅशनल सामने खेळले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER