‘१२ ऑक्टोबरचा अंधार’ अनिल देशमुख अन् नितीन राऊत यांनी राजीनामा द्या; भाजपाची मागणी

nitin raut - anil deshmukh - Chandrashekhar Bawankule

नागपूर : राजधानी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा वीजपुरवठा १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता खंडित झाला होता. अडीच- तीन तासांनी तो सुरू झाला. तो घातपात होता, असा खुलासा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केला होता.

ते म्हणालेत, त्यावेळी, मी हा घातपात असल्याचे सूतोवात केलं होते. तेव्हा अनेकांनी मला वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वस्तूस्थिती अशी आहे की तो घातपातच होता. यासंदर्भात सायबर विभागाकडून मला संध्याकाळी ६ वाजता अहवाल देण्यात येईल.

गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर हा रिपोर्ट मला मिळेल, असे नितीन राऊत यांनी सांगितलं. वॉशिंग्टन पोस्टमध्ये जो रिपोर्ट आला आहे, त्यासंदर्भातही सर्व माहिती मी तिथेच देईन, असे नितीन राऊत यांनी सांगितले आहे. राऊत यांच्या या विधानावर भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली. बावनकुळे म्हणालेत, १२ ऑक्टोबर रोजी मुंबईत ४ तास वीज बंद होती. या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख आणि उर्जामंत्री नितीन राऊत यांनी पाठ थोपटून घेण्याचा प्रकार केला. कपोलकल्पित अहवालाच्या आधारावर जनतेला मूर्ख बनविण्याचे काम केले आहे.

एका आंतरराष्ट्रीय पेपरच्या आधारावर आयपीएस ऑफिसरने अहवाल तयार केला. चीनचे नाव अहवालात होते तर केंद्रीय परराष्ट्र किंवा गृहमंत्रालयाला कळविले होते का, असा सवाल उपस्थित करत हे अधिवेशनाच्या तोंडावर अपयश लपविण्याचे कारस्थान आहे, असे बावनकुळे म्हणालेत. मुंबईला येणाऱ्या ४०० केव्हीच्या दोन लाईन त्यावेळी ब्रेकडाऊन झाल्या होत्या, इतर दोन लाईनवर लोड आले, म्हणून स्पार्किंग झाले, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे.

संबंधित लाईन सायबर अटॅकच्या पातळीच्या नाहीत. हा घातपात नाही, अधिकाऱ्यांनी चूक केली, समन्वय ठेवला नाही. अपयश झाकण्यासाठी दोन्ही मंत्री जनतेला मूर्ख बनवत आहेत. या दोन्ही मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER