
दुनियाभरात निरनिराळ्या पद्धतीने स्मग्लिंग करणाऱ्यांचे अनेक किस्से आपण ऐकलेत. पण देशासाठी शहिद झालेल्या सैनिकांच्या शवपेटीतून ड्रग्ज स्मगलिंग करणाऱ्या स्मगलरबद्दल तुम्हाला माहितीये का? नाव फ्रँकस लुकस. ज्यानं ड्रग्जच्या तस्करीसाठी सगळ्या हद्दी पार केल्या होत्या.
लहानपणापासूनच गुन्हेगाला सुरुवात
अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिनामध्ये राहणाऱ्या फ्रँक लुकसच आयुष्य प्रचंड कष्टात सुरु होतं. त्याच्या डोळ्यासमोर भावाला जीवे मारण्यात आलं. त्याच दिवशी त्याच्यातली माणूसकी मारली गेली. तेव्हा तो फक्त ६ वर्षाचा होता. या घटनेनंतर त्याच आयुष्य बदललं.
घरची जबाबदारी त्याच्यावर होती. त्यालाला कमाईशिवाय पर्याय नव्हता. भूक मिटवायला गुन्हेगारीचा आधार घेण्याशिवाय त्याच्या समोर पर्याय नव्हता. पोटातली आग विझवायला त्याने पहिल्यांदा चोरी केली. नंतर तो किराण्याच्या दुकानातून, मद्यपींच्या खिशातून पैसे चोरू लागला. त्याच्या चोरीच्या कमाईवर घर तर व्यवस्थित चालत नव्हतं पण घरच्यांना पोटभर जेवण मिळायचं. आणि अशा परिस्थितीतच त्याच्या आयुष्याला वेगळं वळण लागलं.
फ्रँक एका ठिकाणी नोकरी करत होता. एके दिवशी मालक दुकानात नसताना दुकानात ४०० डॉलर्सची चोरी झाली. पोलिस फ्रँकच्या घरी पोहचले. त्यादिवशी तो फरार झाला आणि नंतर घरी परतलाच नाही.
१५ वर्षे ड्रायव्हर राहिल्यानंतर बनला सर्वात मोठा गँगस्टर
फरार झाल्यानंतर फ्रँक सरळ न्यूयॉर्कला पोहचला. न्यूयॉर्कमध्ये गुन्हेगारी जगत आकार घेत होतं. रोज नवे नवे गुन्हेगार तिथं यायचे. फ्रँकही तिथलाच झाला. मोठ्या स्तरावरची संघटीत गुन्हेगारीत तो ओढला गेला. त्याची ओळख जॉनसनशी झाली. फँकमधली प्रतिभा त्याने ओळखली आणि फँकला त्यानं ड्रायव्हरची नोकरी दिली. फँकला वाटलं ही नव्हती की तो अमेरिकेतल्या सर्वात मोठ्या गँगस्टरचा ड्रायव्हर बनेल.
जॉनसननं फ्रँकला गुन्हेगारीतल्या सर्व गोष्टी शिकवल्या. १५ वर्षे तो ड्रायव्हर बनून राहिला. १९६८ला अचानक जॉनसनचा मृत्यू झाला. आता बारी फ्रँकची होती गुन्हेगारीच्या जगताचा राजा बनण्याची.
आणि ड्रग्जच साम्राज्य उभं राहिलं
फ्रँकनं जॉनसनचा सर्व व्यवसाय हातात घेतला. आणि ड्रग्जचा व्यवसाय सुरु केला. त्यानं मोठ्या प्रमाणात ड्रगची तस्करी अमेरिकेत केली. अमेरिकेच्या गल्ली गल्लीत त्यानं ड्रग्ज विकलं. ड्रग्जच्या व्यवसायात फ्रँकनं भरपूर पैसा कमवला. त्याला आणखी पैसे कमवायचे होत पण या व्यवसातले मध्यस्थ भरपूर पैसा लाटायचे. त्याच्या व्यवसायात इतर गुंडांनी हस्तक्षेप केला. परिणामी मोठ्याप्रमाणात हिंसाचार वाढला. अनेकांच्या हत्या झाल्या.
शहिद जवानांच्या शवातून सुरु केली ड्रग्जची स्मगलिंग
फ्रँकच्या ड्रग्ज व्यवसायाला मध्यस्त चालवायचे. पण नंतरच्या काळात त्यांनी फ्रँकला पैसा पोहचू दिला नाही. यामुळं त्यांच्या हत्या करण्यात आल्या. ड्रग्ज अमेरिकेत आणायला त्याच्याजवळ दुसरा कुठलाच मार्ग नव्हता न माणसं. त्याच्या ड्रग्जवर पोलिसांनी छापे मारले. फ्रँकला काय करावं काहीच सुचत नव्हतं. त्यावेळी व्हिएतनाम अमेरिका युद्धाला सुरुवात झाली. आशियातून ड्रग्ज येणं जवळपास बंद झालं होतं.
फ्रँक काही वेळासाठी थायलंडला गेला. तिथं ब्लू मॅजिक नावाचं ड्रग्ज त्याने पाहिलं. ते अमेरिकेत विकलं तर कोट्यावधी कमावता येतील हे त्याला कळालं. पण हे ड्रग्ज अमेरिकेत न्यायचं कसं याचा मार्ग त्याला सापडत नव्हता. यावर त्यान युक्ती केली.
व्हिएतनामध्ये तैनात असणाऱ्या अमेरिकेच्या सैन्यदलातील अधिकाऱ्यांना मोठी लाच दिली. व्हिएतनाम युद्धात शहिद होणाऱ्या सैनिकांच्या पेटीत ड्रग्ज लपवून त्याची तस्करी अमेरिकेत व्हायला लागली. तब्बल ५०० शहिद जवानांच्या पेट्यांमधून ड्रग्ज अमेरिकेत आणले गेले. या युक्तीमुळं फ्रँकन प्रतिदिन दहा लाख डॉलर कमावले होते.
साम्राज्याला लागला सुरुंग
फ्रँकच्या ब्लू मॅजिक ड्रग्जचा अमेरिकेत वणव्यासारखा प्रसार झाला. इतर नशेच्या पदार्थापेक्षा ते कित्येक पटीनं तगडं होतं. अनेक जणांचा ओव्हर डोसमुळं मृत्यू झाला. पोलिसांना याची भनक लागली. फ्रँकच्या घरावर पोलिसांनी छापा मारला. त्याला अटक झाली. त्याच्या साम्राज्याला सुरुंग लागला. वयाच्या ७०व्या वर्षी फ्रँकचा तुरुंगात मृत्यू झाला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला